कर्जत बाजारपेठेतील मोठा खड्डा ” स्वखर्चाने ” बुजवला !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – नेहमीच कर्जतकर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ” तळमळीने ” काम करणारे , एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल ” असा संदेश घेऊन कार्य करणारे कर्जत नगर परिषदेचे शिवसेनेचे नगरसेवक ” ॲड. रोहित राजेंद्र ओसवाल ” यांचे नाव पुढे येत आहे. कर्जत बाजारपेठ असो की महावीर पेठ , मच्छी मार्केट असो की श्री कपालेश्वर मंदिर परिसर ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग असो . या प्रभागातील नागरिकांच्या सर्व समस्या एका ” चुटकीत ” सोडविण्याचा ” हातखंडा ” कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या नेतृत्वाखाली व गटनेते ” ॲड. संकेत दादा भासे ” यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक ” रोहित ओसवाल ” यांचा आहे.
कर्जत बाजारपेठेतील प्रीतीसंगम साडी सेंटर व पद्मावती ज्वेलर्सच्या बाहेर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठा खड्डा पडलेला होता. या खड्ड्यामुळे नागरिक, व्यापारी तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन व आलेल्या तक्रारीचा तडफेने विचार करून नगरसेवक ॲड. रोहित राजेंद्र ओसवाल यांनी पुढाकार घेत , क्षणात आपले सहकारी आशिष वर्मा , रोहित बाफना , विनायक गायकवाड , विक्रम ओसवाल आणि अश्विन जैन यांच्या मदतीने स्वखर्चातून तातडीने सदर खड्डा सिमेंट काँक्रिट करून भरून घेतला.
या कामामुळे बाजारपेठेतील नागरिक व व्यापारी बांधवांची गैरसोय दूर झाली असून, नागरिकांना आता सुखरूप चालता येणार आहे. नागरिकांनी या तातडीच्या कामाबद्दल तडफदार व कर्तव्यदक्ष शिवसेनेचे नगरसेवक ” ॲड. रोहित राजेंद्र ओसवाल ” यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
जनतेची समस्या हीच आमची जबाबदारी , नेहमी जनतेसाठी , नेहमी समाजासाठी कार्यतत्पर राहून सेवा करणार , असे भावनिक मत नगरसेवक ” ॲड. रोहित राजेंद्र ओसवाल ” यांनी याप्रसंगी व्यक्त केले.


















