
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – ग्रेटर नोएडा येथील ” इनोव्हेटिव्ह कॉलेज ऑफ फार्मसीत ” मंगळवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी ” स्वच्छ ग्रहासाठी हरित औषध विज्ञान – औषधीय प्रदूषण कमी करणे ” या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली. परिषदेचा उद्देश औषधांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे, पर्यावरणपूरक औषध निर्मितीला चालना देणे आणि शाश्वत विकास घडवणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना व दीपप्रज्वलनाने झाली. समूहाचे अध्यक्ष ” डॉ. के. आर. शर्मा ” यांनी हरित औषध विज्ञान आणि औषध कचरा व्यवस्थापनाची गरज यावर भर दिला. प्राचार्य प्रा. डॉ. अमरजीत सिंह यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक संशोधनाचे आवाहन केले, तर शैक्षणिक संचालिका डॉ. तितिक्षा शर्मा यांनी शिक्षण व संशोधनाची भूमिका विशद केली.
या परिषदेत डॉ. विजय सिंह राणा, डॉ. शाहिद करीम, प्रा. डॉ. धर्मेंद्र कुमार, डॉ. राजेश श्रीधरन नायर आणि श्री. आशीष गर्ग , या देश-विदेशातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी शोधनिबंध व पोस्टर सादरीकरण झाले. श्री. सौरभ सरस्वत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

















