कामशेतमध्ये गांजासह तरुण ताब्यात; 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

चिखलसे येथील कारवाई; 1 किलो 110 ग्रॅम गांजा पोलिसांनी केला जप्त.

कामशेत : दिनांक 28 , रोजी कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थविरोधी कारवाई करत पोलिसांनी एका 37 वर्षीय व्यक्तीला गांजासह ताब्यात घेतले. चिखलसे गावच्या हद्दीत कामशेत-पवनानगर रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या मैदानाजवळ ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 1 किलो 110 ग्रॅम गांजा आणि मोबाईल फोन असा एकूण 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सचिन भगवान पवार (वय 37, रा. पवना चौक, कामशेत) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कामशेत पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत असताना पवार हा संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 1 किलो 110 ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 55 हजार 500 रुपये असून, 10 हजार रुपये किमतीचा OPPO कंपनीचा मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गु.र.नं. 207/2026 नुसार गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 मधील कलम 8(क), 20(ब), ii(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि SDPO गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रभारी अधिकारी आकाश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या पथकात सहाय्यक फौजदार जितेंद्र कदम, पोलीस हवालदार दुर्गा जाधव, आशिष झगडे, रवींद्र राय, जितेंद्र दीक्षित तसेच पोलीस शिपाई रवींद्र राऊळ, मंगेश मार्कड, महेश थोरात, गणेश ठाकूर, धनाजी मोटे आणि सौरभ गायकवाड यांचा समावेश होता.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत.

Views: 227

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick