उपसभापती ” सचिनभाऊ अहिर ” यांच्या कडून शाळेसाठी ५ लाखांची देणगी !आमदार ” महेंद्र शेठ थोरवें फाउंडेशनच्या ” वतीने शाळेस २० कॉम्प्युटर देण्याची घोषणा…

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –खालापूर तालुक्यातील वावोशी येथे ” अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या ” वतीने गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, छत्री, वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विधानपरिषदेचे उपसभापती ” मा. सचिनभाऊ अहिर ” आणि आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, विद्यार्थ्यांच्या हातात दिलेले दप्तर हे केवळ एक वस्तू नसून त्यामध्ये आई-वडिलांची स्वप्ने, शिक्षकांच्या अपेक्षा आणि स्वतःचे आयुष्य मोठे करण्याची संधी दडलेली असल्याचे सांगितले.
यावेळी विधान परिषदेचे उपसभापती मा. श्री. सचिनभाऊ अहिर यांनीही मनोगत व्यक्त केले. अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सेवाभावी भावनेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी उपसभापती मा. श्री. सचिनभाऊ अहिर यांनी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज, वावोशी या शाळेसाठी ५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने या शाळेस २० कॉम्प्युटर देण्याची घोषणा केली.
याप्रसंगी उपसभापती सचिन भाऊ अहिर, अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.अशोकजी छाजेड, सौ संगीता छाजेड,शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विजय भाऊ पाटील, ट्रस्टचे उपाध्यक्ष ॲड. संतोष खांडेकर, शिवसेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य शरद कदम, सामाजिक कार्यकर्ते संदेश पाटील , सामाजिक कार्यकर्ते हरीश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत खांडेकर, माजी सरपंच वावोशी राजू शहासणे, शिवसेना संघटक शशी विचारे, माजी सरपंच आपटी शशी मोरे, सागर हडप (सरपंच गोरठण), रमेश पाटील (मा सरपंच गोरठण), युवा सेना विधानसभा प्रमुख रोहीत विचारे, शांताराम हडप, माजी उपसरपंच नंदन पाडा गणेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक मराजगे, अविनाश आमले (सरपंच तांबाटी), सामाजिक कार्यकर्ते शशी भाऊ पाटील, माजी सरपंच गोरठण महेश पाटील, युती सेना खालापूर पुजा धारणे, युवा सेना विभाग प्रमुख किरण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

















