गुंडगे बुद्ध विहाराला मिळणार नवा लुक , माजी नगरसेविका वैशाली मोरे यांच्या प्रयत्नाने काम लागणार मार्गी..

” शिवसेनेच्या नगरसेविका अरुणा वायकर – जान्हवी देवघरे – आर पी आय मा सभापती वैशाली मोरे ” यांच्या शुभहस्ते सुशोभीकरणाचे भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातील अनेक महिने रखडलेले बुद्ध विहाराचे काम अखेर मंजुरी मिळून मार्गी लागले. गुंडगे प्रभागाच्या माजी नगरसेविका तथा मागासवर्गीय कल्याण विशेष समिती सभापती सौ वैशाली दिपक मोरे यांच्या विशेष प्रयत्नातून साकार होणाऱ्या या बुद्ध विहारला विविध निवडणुका आल्याने वर्क ऑर्डर मिळण्यास उशीर झाला.

याकामी ” नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे ” यांचे विशेष सहकार्य मिळाल्याने हे लांबणीवर पडलेली वर्क ऑर्डर मिळून आज गुरुवार दिनांक ०५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता महायुतीतील शिवसेनेच्या नगरसेविका सौ अरुणा प्रदिप वायकर , नगरसेविका सौ. जान्हवी सुदेश देवघरे , माजी सभापती सौ. वैशाली दिपक मोरे यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद दादा मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुंडगे प्रभागातील ” बुद्ध विहाराच्या ” नूतनीकरण व सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन नारळ वाढवून व कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले.


यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात विचार पिठावर शिवसेनेच्या नगरसेविका सौ अरुणा प्रदिप वायकर , नगरसेविका सौ. जान्हवी सुदेश देवघरे , माजी सभापती सौ. वैशाली दिपक मोरे , कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर पवार , माता रमाई महिला मंडळ गुंडगे अध्यक्षा मीनाक्षी भवर , माजी नगरसेवक दिपक मोरे, बौद्धचार्य संतोष सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवर नगरसेविका यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले.


यावेळी या बुद्ध विहाराच्या सुशोभीकरणाचे काम २९.७६ लाखांचे ( जीएसटी सहित ) असून यांत बुद्ध विहारात इंटेरियर , बुध्दविहाराचे अंतर्गत व बाह्य सुशोभीकरण, वेलकम गेट आकर्षक कमान , कपाऊंड करणे , हे काम मागील महायुतीची सत्ता असताना मंजूर झाले होते , मात्र विविध निवडणुकींच्या आचार संहितामुळे या कामाची वर्क ऑर्डर मिळाली नव्हती , परिवर्तन विकास आघाडीची सत्ता येऊन १ वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना अखेर अथक प्रयत्न करून या कामाची वर्क ऑर्डर ” नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे ” यांच्या सहकार्याने मिळाली , असे मत माजी नगरसेवक दिपक भागा मोरे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी या कामाला नगरसेविका सौ अरुणा प्रदिप वायकर , नगरसेविका सौ जान्हवी सुदेश देवघरे , सामाजिक कार्यकर्ते शरद दादा मोरे , गुंडगे अध्यक्षा मीनाक्षी भवर , बौद्धचार्य संतोष सोनावणे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या भूमिपूजन सोहळ्यास ज्येष्ठ आंबेडकरी अनुयायी सुनील चव्हाण बाबा , शिवसेनेचे उपशहर प्रमुख दिनेश कडू , शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी प्रदिप वायकर , सुदेश देवघरे , स्वप्नील जाधव , सामाजिक कार्यकर्ते शरद दादा मोरे , दिगंबर पवार , गौतम मामा कांबळे , उद्योजक अजय पाल व विजय पाल , माजी नगरसेवक तथा आर पी आय कर्जत शहर अध्यक्ष अरविंद मोरे , आनंद भाऊ पवार , गौतम कांबळे , प्राण मोरे , अनिता शरद मोरे , प्रतिभा कदम , प्रज्ञा पवार , मीना कांबळे , सुनीता शिंदे , पूजा सरावते, सविता मोरे , शोभा मोरे , जयश्री पवार , साधना सावंत , सरिता मोरे , प्रियांका मोरे , सानिका कदम, प्रदीप मोरे , सूरजबली यादव , मनिष मोरे, आकाश धुरी , रोहन मोरे , भूषण मोरे , रूपेश घोडके , श्रीकांत गायकवाड , उत्कर्ष गायकवाड , प्रतीक कदम , सक्षम पवार , चैतन्य मोहिते ,आनंद घोडके , संतोष भवर , आदर्श घोडके ,पार्श्व गायकवाड , आदी गुंडगे ग्रामस्थ , महिला वर्ग त्याचप्रमाणे ठेकेदार साहिल मोरे उपस्थित होते.

Views: 333

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick