फोटो आणि व्हिडिओ हटविण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; पुण्यातील व्यक्तीविरुद्ध लोणावळ्यात गुन्हा दाखल..

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप; लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लोणावळा : फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन देत महिलेशी जवळीक साधल्यानंतर तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर प्रकार लोणावळ्यातील एका लॉजवर घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील एका व्यक्तीविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“या प्रकरणी मुंबईतील ४१ वर्षीय महिलेने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे  आदेश हेमचंद कस्तुरकर (रा. वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी लोणावळ्यातील मातृछाया लॉज येथे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून टाकण्याचे आश्वासन देत आरोपीने त्यांच्याशी गोड बोलून विश्वास संपादन केला. त्यानंतर शीतपेयामध्ये गुंगीची गोळी टाकून ते शीतपेय महिलेला दिले. त्या बेशुद्ध अवस्थेत असताना आरोपीने त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ३५१(२), ३५१(३) आणि ३५६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे करीत आहेत.

अष्ट दिशा 24/7 NEWS

Views: 514

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick