किरवलीतील ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” नगरचा जळालेला ट्रान्सफॉर्मर अखेर बदलला ! ..” हिरामणभाई गायकवाड ” यांच्या पुढाकाराने वीजपुरवठा सुरळीत..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – किरवली येथील ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” नगर परिसरातील ट्रान्सफॉर्मर काल सकाळी जळाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची तातडीने दखल घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) आठवले पक्षाचे कर्जत तालुकाध्यक्ष ” हिरामणभाई गायकवाड ” यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी पाठपुरावा केला.
आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष ” हिरामण भाई गायकवाड ” यांच्या या पाठपुराव्यामुळे अखेर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व किरवली ग्रामस्थांनी आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष ” हिरामण भाई गायकवाड ” है तो नो टेंशन , अशी जोरदार चर्चा येथे सुरू आहे. नेहमीच किरवली ग्रामपंचायत हद्दीत प्रत्येक समस्या सोडविण्यात आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष ” हिरामण भाई गायकवाड ” यांचा पुढाकार असतो , हेच त्यांच्या या कृतीतून दिसून आले.
या ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामात महावितरणचे उपविभागीय अभियंता चंद्रकांत संग्राम केंद्रे , अनुपजी इंगळे , तसेच लाईनमन गणेश गावंड यांनीही महत्त्वाचे सहकार्य केले.
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तातडीने पाठपुरावा करून नागरिकांची समस्या मार्गी लावल्याबद्दल स्थानिक नागरिकांकडून हिरामणभाई गायकवाड , महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

















