भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –रायगड जिल्ह्यात सायबर गुन्ह्यात वाढ होत असल्याने पोलीस जिल्हा अधीक्षक ” आँचल दलाल ” यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे हद्दीत सावधानता बाळगण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक ” उमेश पाटील ” यांनी नागरिकांनी सावधानता बाळगावी म्हणून ” सायबर सुरक्षा जनजागृती ” करून नागरिकांना सावधान केले.
मोबाईल जरी आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाची भूमिका बजावत असला तरी तिथूनच गुन्ह्यांची सुरुवात होत असून सायबर गुन्हे , पैशांवर डल्ला , क्राईम , फसवाफसवी , बाल गुन्हे , हनी ट्रॅप , प्रेम संबंध फसवणूक , नोकरीची फसवणूक , अल्पवयीन मुलींच्या पोस्को सारख्या घटना , बक्षीस – लॉटरी फसवणूक , कर्ज – लोन फसवणूक , नोकरी फसवणूक , UPI फसवणूक , बनावट लिंक , गुंतवणूक फसवणूक , ऑन लाइन फसवणूक , अश्या विविध सायबर गुन्ह्यांपासून सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी केले.
१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर हा महिना ” राष्ट्रीय सायबर सुरक्षा महिना ” म्हणून साजरा होत असताना मोबाईल , इंटरनेट , सायबर हे आजच्या या आधुनिक तंत्रज्ञान युगात काळाची गरज आहेत , मात्र यातूनच सायबर फसवणुकीचे गुन्हे होत असून यांत खबरदारी घेणे , तितकेच गरजेचे झाले आहे , यावर प्रकाश पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी टाकला.

















