फेरियस हॉटेलजवळ झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत व्यक्तीचा मृतदेह; लोणावळा शहर पोलिसांचा तपास सुरू..

लोणावळा : लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेरियस हॉटेलजवळ महामार्गालगत एका व्यक्तीने झाडाला गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना १९ सप्टेंबर रोजी समोर आली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.

फेरियस हॉटेलजवळ महामार्गाच्या बाजूला असलेल्या झाडीच्या परिसरात एका व्यक्तीने झाडाच्या फांदीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तत्काळ लोणावळा शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, या घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

मृतदेहाबाबत पुढील वैद्यकीय प्रक्रिया पोलिसांकडून करण्यात येणार असून, या घटनेचा अधिक तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.

अष्ट दिशा 24/7 NEWS
सत्य बातमी, थेट तुमच्यापर्यंत.

Views: 735

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick