मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर साखरेचा ट्रक पलटी; रस्त्यावर साखरेचा खच, वाहतुकीवर परिणाम..

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी हद्दीत बुधवारी (२६ ऑगस्ट) साखर वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने अपघात झाला. अनियंत्रित ट्रेलरने साखरेच्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

धडकेनंतर साखरेचा ट्रक द्रुतगती मार्गावर उलटला. ट्रकमधील साखरेची पोती फाटून मोठ्या प्रमाणात साखर रस्त्यावर विखुरली. त्यामुळे एक्सप्रेसवेवर काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेली साखर हटविण्याचे तसेच अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले.

या अपघातामुळे द्रुतगती मार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अपघातात जीवितहानी किंवा कोणी जखमी झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांच्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षितपणे वाहन चालविण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Views: 119

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick