लोणावळ्यात गळफास घेतलेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटली..

लोणावळा : खंडाळा येथील आर. पी. टी. एस.  परिसराच्या जवळील मोकळ्या जागेत 19 सप्टेंबर रोजी झाडाच्या फांदीला निळ्या रंगाच्या कापडाने गळफास घेतलेल्या अवस्थेत सुमारे 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

मृत व्यक्तीच्या अंगावर हिरवा टी-शर्ट आणि निळी जीन्स होती. तसेच डाव्या हाताच्या मनगटावर ब्लेडने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या होत्या. मृत व्यक्ती अनोळखी असल्याने तिची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते.

मृत व्यक्तीचा मोबाईल लॉक अवस्थेत होता, तर त्यातील सिमकार्ड तोडून फेकून देण्यात आले होते. त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तपास यंत्रणा फिरवली. अखेर पोलिसांच्या तपासातून मृत व्यक्तीची ओळख समोर आली.

मृत व्यक्तीचे नाव मार्सेल इसिडोर मेंडोन्सा (रा. ठाणे) असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

दरम्यान, मेंडोन्सा यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत लोणावळा शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

Views: 287

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick