मावळात प्रशिक्षणार्थी तरुणीवर अत्याचार; अकॅडमी चालकाला न्यायालयीन कोठडी..

वडगाव मावळ, दि. १ : पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईहून मावळात आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी शौर्य करिअर अकॅडमीचा चालक व प्रशिक्षक राजू लक्ष्मण माडगी (वय ३१, रा. चतुर्भुज रेसीडेन्सी, फ्लॅट क्रमांक २०१, विशाल लॉन्स, वडगाव, ता. मावळ) याला वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली. आरोपीला सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी केशव नगर, वडगाव येथील शौर्य करिअर अकॅडमीत पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होती. २७ ऑगस्ट रोजी रात्री १०.०३ वाजता ते २८ ऑगस्ट रोजी सकाळी ५.४० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तरुणीला फोन करून आपल्या राहत्या घरी नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर तरुणीने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एफ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने या प्रकरणात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन बलभीम टोम्पे करीत आहेत.

Views: 1,034

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick