मावळच्या मतदारयादीत मोठा पेच; ९२ हजार ६५ मतदारांच्या नोंदी अद्याप अनिश्चित..

SIR पुनरिक्षणात ७५.९५ टक्के मतदारांची नोंद निश्चित; उर्वरित मतदारांच्या नोंदीकडे लक्ष.

मावळ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत मावळ विधानसभा मतदारसंघातील तब्बल ९२ हजार ६५ मतदारांच्या नोंदी अद्याप निश्चित झालेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मतदारांची नावे आगामी अंतिम मतदारयादीत कायम राहणार का, याकडे राजकीय पक्षांसह मतदारांचे लक्ष लागले आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ८२ हजार ७७८ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख ९० हजार ७२३ मतदारांची नोंद SIR पुनरिक्षणात निश्चित झाली आहे. ही संख्या एकूण मतदारांच्या सुमारे ७५.९५ टक्के आहे. तर उर्वरित ९२ हजार ६५ मतदारांच्या नोंदी अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.

नावे निश्चित न होण्यामागे काय ?SIR प्रक्रियेत मतदारांच्या नोंदींची पडताळणी करण्यात येत आहे. काही मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे किंवा गणना पत्रकाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यांच्या नोंदी अद्याप निश्चित झालेल्या नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ही ९२ हजार नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत, असा अर्थ काढणे सध्या योग्य ठरणार नाही.

दरम्यान, राज्यातील SIR प्रक्रियेच्या वेळापत्रकात निवडणूक आयोगाने बदल केला असून अंतिम मतदारयादीच्या प्रकाशनाची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित मतदारांना आपली नोंद तपासण्याची आणि आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी उपलब्ध आहे.

मतदारांनी काय करावे ? मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपले नाव मतदारयादीत आहे की नाही, तसेच आपली नोंद योग्य आहे का, याची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. पुणे जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावरून मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अष्टदिशा न्यूजचा सवाल : मावळातील ९२ हजार ६५ मतदारांच्या नोंदी अद्याप निश्चित झालेल्या नसताना, अंतिम मतदारयादीत या मतदारांचे काय होणार ?

Views: 65

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick