मावळच्या श्रीहरी पावशेरे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव..

औंढे येथील नागनाथ माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाच्या शैक्षणिक कार्याची ‘आदर्श रायगड’कडून दखल..

मावळ : मावळ तालुक्यातील औंढे येथील नागनाथ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्रीहरी बाबुराव पावशेरे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीतही ज्ञानदानाचे कार्य निष्ठेने पार पाडत विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्यात दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

मराठी अस्मितेचा मानबिंदू असलेल्या ‘आदर्श रायगड’ पाक्षिकाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यात श्रीहरी पावशेरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘आदर्श रायगड’चे मुख्य संपादक रमेश सणस यांनी पावशेरे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांच्या निवडीची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षक म्हणून आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणाऱ्या पावशेरे यांच्या कार्याचा या सन्मानाच्या माध्यमातून गौरव करण्यात आला.

कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते श्रीहरी बाबुराव पावशेरे यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ‘आदर्श रायगड’चे सहसंपादक अविनाश म्हात्रे आणि कार्यकारी संपादक शैलेश सणस यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले.

श्रीहरी बाबुराव पावशेरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाप्रमुख, नागनाथ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Views: 24

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick